SHARE

मुलुंड येथील व्होडाफोन कंपनीचं गोडाऊन फोडून त्यातील 90 लाखांच्या टेलिकॉम इक्विपमेंटची चोरी करणाऱ्या दोघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. याचसोबत चोरी केलेलं टेलिकॉम इक्विपमेंटही जप्त करण्यात आले आहे. याप्रकारणी शिवशंकर कनोजिया(२३), दिलीप दुबे (२६) नावाच्या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली आहे.


चोरी उघडकीस

व्होडाफोन कंपनीसाठी लागणाऱ्या टेलिकॉम इक्विपमेंटचं खासगी गोडाऊन मुलुंड येथे आहे. ज्यात कोट्यवधी रुपयांची टेलिकॉम उपकरणे ठेवलेली आहेत. बुधवारी सकाळी गोडाऊन उघडले असता त्या गोडाऊच्या शटरचा दरवाजा तोडलेल्या अवस्थेत आढळला. दुकानात चोरी झाल्याचं समजताच तात्काळ मालकाने मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.


आरोपीला अटक

तपासादरम्यान चुनाभट्टीत राहणाऱ्या शिवशंकर कनोजिया आणि त्याचा साथीदार असलेल्या दिलीप दुबे यांच्यावरील संशय बळावल्यानं पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची कसुन चौकशी केली असता दोघांनी गुन्हा कबूल केल्याचं मुलुंड पोलिसांनी सांगितलं. हे दोघेही 90 लाखांचं टेलिकॉम इक्विपमेंट गुजरातमध्ये विकणार असल्याचं तपासात समोर आलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या