टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सायन पुलावरील एका मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेने येताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
SHARES


भरधाव टेम्पोने ३ दुचाकींना दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सायन पुलावर घडली. या घटनेत चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी टेम्पो चालक आदेश वानखेडेला पोलिसांनी अटक केली आहे.

सायन पुलावरील एका मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेने येताना चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार काही 
अंतरावर फेकले गेले. तर अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात अब्दुल वाहिद मोहम्मद रोशन, खालिदा अब्दुल वाहिद, अब्बास अली शेख, बादशाह मयुद्दीन, उमेश सहानी आणि एका महिलेला गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ  सायन रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अब्दुल आणि खालिदा यांचा मृत्यू झाला असून अन्य जखमींवर उपचार सुरू आहे. या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली.
संबंधित विषय