मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला

नियंत्रण सुटलेल्या ट्रॉलीची धडक सामान चढविणाऱ्या शिडीला जोरदार बसली.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला
SHARES

मुंबईच्या छत्रपती विमानतळावर स्पाइसजेटच्या सामान नेणार्या ट्राॅलीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी ट्राॅलीने विमानात प्रवाशांना चढण्यासाठी उभ्या करण्यात आलेल्या शिडीला धडक दिली. हीच धडक जर विमानाला बसली असती तर मोठा अपघात झाला असता. या अपघातात एक कर्मचारी जखमी झाला आहे.  

 

प्रवाशांचे तसेच विमानातील अन्य सामान विमानापर्यंत आणण्यासाठी ट्रॉलीचा उपयोग केला जातो. त्यानंतर हे सामान एका इलेक्ट्रॉनिक शिडीतून विमानात चढवले जाते. रविवारी रात्री स्पाइसजेटच्या बोइंग ७३७ जातीच्या विमानात चढविण्यासाठी ही ट्रॉली घेऊन कर्मचारी विमानाकडे निघाला. त्याच्या ट्रॉलीच्या वेगामुळे एका वळणावर त्याचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या ट्रॉलीची धडक सामान चढविणाऱ्या शिडीला जोरदार बसली. त्यानंतर ही शिडी इंजिनावर जाऊन आदळली. यामुळे इंजिन बिघडले व ट्रॉलीचा चालकही जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे स्पाइसजेटकडून सांगण्यात आले आहे. सामान वाहून नेणारी ट्रॉली शिडीऐवजी थेट इंजिनाला धडकली असती तर या इंजिनाला जोडलेल्या इंधन टाकीला धक्का लागला असता. विमानातील हवाई इंधन अत्यंत ज्वलनशील असते. यामुळे हा धक्का लागून मोठ्या अपघाताची भीती होती.

 

 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा