चोरीच्या गाड्यांची बनावट कागदपत्रं बनवणाऱ्यास अटक


चोरीच्या गाड्यांची बनावट कागदपत्रं बनवणाऱ्यास अटक
SHARES

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिक शस्त्रास्त्र प्रकरणातील मुख्य अारोपी सुका पाशाने चोरलेल्या गाड्यांची बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्याला गुन्हे शाखेच्या सीअाययू विभागानं अटक केली अाहे. करीम सय्यद असं या अारोपीचं नाव असून न्यायालयानं त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली अाहे.


घरी बनवायचा बनावट कागदपत्रे

शिवडीत राहणारा करीम सय्यद हा सुका पाशासाठी काम करायचा. सुकाने चोरून अाणलेल्या गाड्यांची कागदपत्रे तो अापल्या घरी बनवायचा.


असा सापडला जाळ्यात

हत्यार तस्करीत अटक करण्यात अाल्यानंतर सुका पाशाच्या घरी पोलिसांनी १८ डिसेंबर रोजी छापा टाकला. त्यावेळी सुकापाशाची बहीण पोलिसांची नजर चुकवून एका पिशवीतून काहीतरी नेत होती. पोलिसांनी त्या पिशवीची तपासणी केली असता, विविध गाड्यांची बोगस कागदपत्रे त्यात अाढळून अाली. त्यात करीम सय्यदचे नाव पुढे अाल्यानंतर पोलिसांनी त्याला शिवडीतून घरातून ताब्यात घेतले.


झडतीत सापडली बोगस कागदपत्रे

करीमच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता, अनेक बाेगस कागदपत्रे, बनावट अाधारकार्ड, निवडणूक अोळखपत्र साहित्य तसंच राजमुद्रा स्टॅम्प्स अाढळून अाले. पोलिसांनी करीमवर गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू असल्याचे खंडणी विरोधी पथकाकडून सांगण्यात अाले.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा