'लॉकडाऊन'मध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजाविणा-या पोलिसांचे होणार कौतुक


'लॉकडाऊन'मध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजाविणा-या पोलिसांचे होणार कौतुक
SHARES
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले असुन, आत्तापयर्यंत कोरोनाच्या संसर्गात ८ लाख नागरीकांना जीव गमावावा लागल्याने, अनेक देशांनी लॉकडाऊन सुरु केले आहे. तर या लॉकडाऊनची संपूर्ण जबाबदारी पोलिस दलावर आली असुन, या लॉकडाऊनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या पोलिस अधिकारी-कर्मचा-यांना कोरोनाचे संकट मावळताच योग्य ती बक्षिसी दिली जाणार आहे. त्या संदर्भात उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारी-कर्मचा-यांचा अहवाल बनवुन तो गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-याने दिली.


लॉकडाऊनचे नियम नागरीकांनी पाळावे, यासाठी अहोरात्र पोलिस दल झटत आहे. देशांत कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असताना देखील काही नागरीक सर्रास नियम तोडत आहेत.  यामुळे लॉकडाऊनचा नियम धाब्यावर बसविणा-यांवर कारवाई करण्याची वेळ पोलिस दलावर आली आहे. तर पोलीस दल देखील डोळ्यात तेल घालुन अहोरात्र त्यांचे कर्तव्य बजावित आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन पोलिस दलातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत. जे अधिकारी-कर्मचारी वैद्यकीय सुट्टीवर आहेत, त्यांना सोडून अन्य सर्व अधिकारी व कर्मचा-यांना हजर राहण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते.

 त्यानुसार, सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील ड्युटीवर तैनात झाले आहेत. यावेळी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत, संपूर्ण पोलीस दल नागरीकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात झाले आहे. यावेळी येणा-या जाणा-या  नागरीकांच्या सुरक्षेसाठी पुर्ण सुरक्षेत सर्वांची तपासणी करण्याचे काम पोलीस दल करीत आहे. जे नागरीक जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडत आहेत, अशा नागरीकांमुळे कोरोना पसरु नये, यासाठी सोशल डिस्टनशींगचा वापर करण्यात येत आहे. जेणेकरुन एकमेकांच्या संपर्कातुन कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये. पोलिस दलाच्या कर्तव्यनिष्ठेची वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य सरकारने वेळोवेळी दखल घेतली असुन, लॉकडाऊन काळात उत्कृष्ठ कामगिरी बजाविणा-या अधिकारी-कर्मचा-यांचा अहवाल पोलिस आयुक्तांना पाठविण्यास सांगितला आहे. जेणेकरुन कोरोनाचे संकट मावळताच या अधिका-यांना योग्य ती बक्षिसी दिली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा