प्रिन्सिपलचा फोननंबर कॉलगर्ल म्हणून शौचालयात लिहिला, दोघांना अटक


प्रिन्सिपलचा फोननंबर कॉलगर्ल म्हणून शौचालयात लिहिला, दोघांना अटक
SHARES

त्रास देण्याच्या हेतून अनोळखी आरोपींनी प्रिन्सिपलचा फोननंबर कॉलगर्ल म्हणून शौचालयात लिहिल्याने तक्रारदार महिलेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. तर पोलिसांनी तक्रारदार महिलेला वारंवार फोन करणाऱ्या दोघांना नवी मुंबईतून अटक केली आहे. सूरज सिद्धार्थ कांबळे(२५) व मनोज लक्ष्मण देवरुखकर(३१) अशी अटक आरोपींची नावे आहेत.  त्यांच्या चौकशीतून ही सर्वबाब समोर आली असून या प्रकरणी वडाळा पोलिस अधिक तपास करत आहे.

हेही वाचाः- राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांचं नवं पथक?

नवी मुंबईच्या घनसोली परिसरात आरोपी सूरज हा राहतो. नवी मुंबईतील जुई नगर येथील सार्वजनिक शौचालयात तक्रारदार यांचा क्रमांक कॉलगर्ल म्हणून लिहिण्याता आला होता. तो पाहून सूरजने त्यांना दूरध्वनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती सूरजने मनोजला दिली. मनोज हा उल्हासनगर येथील रहिवासी आहे.  कालांतराने या दोघांनीही वारंवार महिलेला फोन करून त्रास देण्यास  सुरूवात केली. ३० डिसेंबर, २०२० पासून त्यांना अशा पद्धतीने शरीरसुखाची मागणी करणारे फोन येण्यास सुरूवात झाल्याने पीडित महिला मानसिक तणावाखाली गेली. एका आरोपीने तर चक्क स्वतःचा फोनंबर पाठवून त्यांच्याकडे छायाचित्राची मागणी केली. आठवडाभर दोनही आरोपींकडून खूप त्रास झाल्यानंतर त्यांनी अखेर ७ जानेवारीला याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारदार खासगी महाविद्यालयात प्रिन्सिपल म्हणून काम करत असून नवी मुंबई येथील रहिवासी आहे.

हेही वाचाः-  या आठवड्यात मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू होणार?

सुरूवातीला तक्रारदार यांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग असल्याचा संशय होता. पण तपासात तसे आढळले नाही. दोनही आरोपी अॅप्लिकेशनच्या माध्यमातून इंटरनेट दूरध्वनी करत होते. इतरवेळी त्यांचे मोबाईल बंद असायचे. अखेर तक्रारदार महिलेच्या मदतीनेच आरोपींना गळ घालण्याचे पोलिसांनी ठरवले. त्यानुसार दूरध्वनी आल्यानंतर तक्रारदार महिलेने आरोपींना हॉटेलमध्ये जाऊया, असे सांगितले. त्या आमीषाला बळी पडून सूरज तेथे आला. त्यानुसार त्याला सापळा रचून पोलिसांनी ८ जानेवारीला अटक केली. त्यानंतर त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून मनोजला पोलिसांनी अटक केली. दोघांचेही मोबाईल जप्त करण्यात आले असून ते न्यायवैधक प्रयोगशाळेच तपासणीसाठई पाठवण्यात आले आहेत. दोघांविरोधात भादंवि कलम ३५४(अ)(विनयभंग), ३५४(ड)(पाठलाग करणे) व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम६७(अश्लीलला पसरवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय