Advertisement

राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांचं नवं पथक?

सरकारला लक्ष्य करण्याऐवजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क राज ठाकरेंना स्वत:च सुरक्षा पुरवण्याचं ठरवलेलं आहे.

राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांचं नवं पथक?
SHARES

महाराष्ट्र सरकारने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यासोबत राज्यातील इतर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. यामुळे सध्या विरोधकांकडून राज्य सरकारवर (maharashtra government) टीका करण्यात येत आहे. परंतु या मुद्द्यावरुन सरकारला लक्ष्य करण्याऐवजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क राज ठाकरेंना स्वत:च सुरक्षा पुरवण्याचं ठरवलेलं आहे. 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसोबतच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यानिमित्तानं ते वांद्रे येथील एमआयजी क्लब इथं आले होते. त्यावेळी तिथं काळ्या टी-शर्टमध्ये काही मनसैनिक दिसत होते. या मनसैनिकांच्या (mns) टी शर्टवर 'महाराष्ट्र रक्षक' असं लिहिण्यात आलं होतं. याबाबत माहिती घेतली असता ही तयारी राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी असल्याचं समजलं.

हेही वाचा- सुरक्षा कपातीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तर...

मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांच्या पुढाकारातून राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पथक स्थापन करण्यात येत असल्याचं कळलं. महारा‌ट्र रक्षक पथक असं या पथकाचं नाव आहे. हे मनसैनिकांचं पथक राज ठाकरे यांच्या सुरक्षा कवचाचं काम करतील. या आधीही जेव्हा राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा काढली होती, तेव्हाही असंच पथक दिवसरात्र 'कृष्णकुंज'वर पहारा देण्याचं काम करत होतं. आताही तसंच पथक स्थापन करण्यात आलेलं आहे.

राज्य सरकारने नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वाय प्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे.

(maharashtra navnirman sena party workers provided personal security to raj thackeray)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा