Advertisement

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत कपात

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी असलेली बुलेटप्रुफ गाडी राज्य सरकारने काढून घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत कपात
SHARES

माजी मुख्यमंत्री आणि  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने कपात केली आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील मंत्र्यांना व नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेविषयी आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचं समजतं.

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी असलेली बुलेटप्रुफ गाडी राज्य सरकारने काढून घेतली आहे. फडणवीस यांची झेडप्लस सुरक्षा काढून त्यांना एस्कॉर्टसह वायप्लस,तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वायप्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे. खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा रद्द करण्यात आली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना एस्कॉर्ट शिवाय सुरक्षा देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दिविजा फडणवीस यांचीही वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच दीपक केसरकर यांची वायप्लस सुरक्षा काढून वाय, आशिष शेलार आणि राम नाईक यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली आहे. 

अंबरीशराव अत्राम, चंद्रकांत पाटील. संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मोरोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वायप्लस एस्कॉर्टसह, वायप्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

विधान परिषदेचे अध्यक्ष राम राजे निंबाळकर यांना वायप्लस एस्कॉर्टसह, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना वायप्लस एस्कॉर्टसह, आमदार वैभव नाईक यांनी एक्स, संदिप भुमारे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे-पाटील आणि सुनील केदार आदी मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा आधी वायप्लस सुरक्षा होती. त्यात वाढ करण्यात आली आहे. सिन्हा यांना एस्कॉर्टसह वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे.वकील उज्ज्वल निकम यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा