TRP Scam: घोटाळ्यात अन्य चॅनेलच्या नावाचाही समावेश, लवकरच होणार कारवाई

रिपब्लिक चॅनेलचे सीएफओ शिवा सुब्रम्हणयम सुंदरमनही चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यानी कळवले.

TRP Scam: घोटाळ्यात अन्य चॅनेलच्या नावाचाही समावेश, लवकरच होणार कारवाई
SHARES

टीआरपी घोटाळा प्रकरणात फक्त मराठी, बाॅक्स मराठी आणि रिपब्लिक भारत या तीन चॅनल बरोबरच आता अन्य चॅनलचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. मुंबई पोलिसांच्या कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे अनेक चॅनेल मालकांचे धाबे दणाणले आहेत. तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊपर्यंत आमच्यावर कारवाई करून नका अशी नरमाईची भूमिका आता रिपब्लिक भारत चॅनेलकडून घेण्यात आली आहे. तर रिपब्लिक चॅनेलचे सीएफओ शिवा सुब्रम्हणयम सुंदरमनही चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्यानी कळवले.

हेही वाचाः- One nation one card: बेस्टमध्ये 'वन नेशन, वन कार्ड'च्या उपक्रमाला सुरुवात

मुंबईत टीआरपीच्या मदतीने जाहिरातदारांना आकर्षित करून मोठ्या प्रमाणात पैसे खिशात पाडू पाहणाऱ्या चॅनेलचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या प्रकरणात फक्त मराठी, बाॅक्स मराठी आणि रिपब्लिक भारत या तीन चॅनेलचा समावेश होता. मात्र पोलिस तपासात अन्य काही चॅनेलचा सहभागदेखील समोर आला आहे. त्यामुळे चॅनेल लवकरच त्या चॅनेलच्या मालकांना देखील चौकशीला बोलवणार असल्याचे तपास अधिकारी सचिन वझे यांनी सांगितले. तर नुसते संशयितच नाही. तर  संशय नसलेल्या चॅनेलमध्ये देखील कोणताही गैरव्यवहार केला जात नाहीना याचीही पोलिस चौकशी करणार आहेत. उदा. एका कंपनीने चॅनेलला महिनाभर जाहिरात दाखवण्यासाठी पैसे दिलेले असतात. मात्र काही कारणास्तव एकाद्यावेळी दिवसभरात ठरलेल्या जाहिरातीचा टप्पा पूर्ण होत नाही. मग त्या जाहिरातीचे पैसे परत अथवा पुढच्या दिवशी जाहिरात दाखवतात. तर अनेकदा जाहिरातीचे नुसते पैसे घेतले जातात. मात्र त्या तुलनेत जाहिरात दाखवली जात नाही.  या व्यवहारात अनेकदा मनी लाँड्रिंग होत असल्याचा पोलिसांना संशय आहे.  

हेही वाचाः- अमित ठाकरेंनी घेतली सरकारची बाजू! म्हणाले, पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा...

त्यामुळे सरसकट सर्व चॅनेलवर येत्या काही दिवसात पोलिस लक्ष ठेवून राहणार आहेत. या घोटाळ्यातील अटक आरोपी विशाल भंडारी याच्या घरातून पोलिसांना डायरी सापडली असून यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीच्या नोंदी आहेत. वाहिन्या आणि त्यांच्या टीआरपीची पोलखोल करण्यासाठी पोलिसांना ही डायरी महत्त्वाची ठरणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा