रेल्वेचे १६ लाख लुटले


रेल्वेचे १६ लाख लुटले
SHARES

मानखुर्द रेल्वे स्थानकावरील तिकिटांच्या विक्रीतून जमा झालेल्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तब्बल १६ लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय वेर्णेकर यांनी सांगितले.


हत्यारांचा धाक दाखवला 

रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या तिकीट विक्रीतून जमा होणारे पैसे सुखरूप पोहचवण्यासाठी रेल्वेने एका कंपनीला कंत्राट दिले होते. बुधवारी नेहमीप्रमाणे कंपनीचे कर्मचारी मानखुर्द रेल्वे स्थानकाहून पैसे घेऊन पुढच्या कलेक्शनसाठी निघून गेले. त्यावेळी खाडीपूल मार्गे कंपनीची गाडी पुढे जात असताना एका कार मधून आलेल्या चार जणांनी गाडी भर रस्त्यात अडवली. त्यावेळी हत्यारांचा धाक दाखवून कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून १६ लाखांची रोकड लुटून ते वाशीच्या दिशेने पळून गेले. 

या लूटीची माहिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर मानखुर्द पोलिस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी चार अनोळखी दरोडेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस सीसीटिव्ही फूटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहे. या चोरी मागे ओळखीच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.हेही वाचा -

पॉर्न व्हिडिओ पाहून बहिणीवरच केला बलात्कार

सालेमच्या भेटीसाठी पोर्तुगाल दुतावास तळोजा कारागृहात


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा