डॅडीच्या हस्तकाला 23 वर्षांनी अटक


डॅडीच्या हस्तकाला 23 वर्षांनी अटक
SHARES

कुख्यात गुंड अरुण गवळी उर्फ डॅडीच्या हस्तकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल 23 वर्षांनी अटक केली आहे. सुरेश उपाध्याय (46) असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.


हत्येचा गुन्ह्याखाली अटक

बदलापूर परिसरात राहणारा सुरेश उपाध्याय हा 90 च्या दशकात डॉन अरुण गवळीसाठी काम करत होता. हत्या आणि हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात भांडुप पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र 1995 मध्ये त्याची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर तो पुन्हा हजरच झाला नव्हता. त्यामुळे न्यायालयानं त्याच्याविरोधात अजामीन वॉरंट जारी केलं.

मागील 23 वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान 20 जुलै रोजी गुन्हेशाखेला उपाध्याय हा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून उपाध्यायला मुंबई उपनगरातून अटक केली.


गुन्ह्याची दिली कबुली

उपाध्यायच्या चौकशीत त्याच्या विरोधात भांडुप पोलिस ठाण्यात दोन तर उल्हासनगर पोलिस ठाण्यात एका हत्येच्या गुन्ह्याची नोंद आहे. तर भांडुप पोलिस ठाण्यातच जिवे मारण्याचा तिसरा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला होता. हे सर्व गुन्हे त्याने गवळी टोळीसाठी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा