'त्या' महिलेचे शिर सांताक्रूझ-चेंबूर, लिंकवर रोड सापडलं?

महिलेचे शिर नसल्यामुळे पोलिसांना तिची ओळख पटवणे कठीण जात होते. अशातच रविवारी लिंक रोड रेल्वे रुळाजवळ एका महिलेचे शिर सापडले.

'त्या' महिलेचे शिर सांताक्रूझ-चेंबूर, लिंकवर रोड सापडलं?
SHARES

मुंबईत माहिम, विद्याविहार पाठोपाठ आता सांताक्रूझ-चेंबूर, लिंक रोड येथील रेल्वे रुळांजवळ महिलेचं शिर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शिर विद्याविहार येथे आढळून आलेल्या  त्या मृत महिलेचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या अनुशंगाने पोलिस तपास करत आहे.

मुंबईत सोमवारी विद्याविहार येथील गटारात गोणीत एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह सापडला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या महिलेचे शिर नसल्यामुळे पोलिसांना तिची ओळख पटवणे कठीण जात होते. अशातच रविवारी लिंक रोड रेल्वे रुळाजवळ एका महिलेचे शिर सापडले. हे शिर याच महिलेचे असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. विद्याविहार येथील घटनेत महिलेचे दोन्ही पाय आणि शिर शरीरापासून वेगळे करण्यात आले होते. या महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा