वडाळ्यात विजेच्या तारेमुळे चोरटा गंभीर जखमी, तीन घरे उद्ध्वस्त


वडाळ्यात विजेच्या तारेमुळे चोरटा गंभीर जखमी, तीन घरे उद्ध्वस्त
SHARES

चोरी करण्यासाठी घरावर चढलेल्या चोराचा तोल गेल्याने त्याने स्वतःच्या बचावासाठी टाटा पॉवरच्या उच्चदाबाच्या तारेला हात लावल्याने तो 80 टक्के भाजला. त्यामुळे तब्बल 3 घरे उद्ध्वस्त झाली असून 4 जण किरोकळ भाजले असल्याची घटना वडाळा (पू.) येथील गणेशनगर झोपडपट्टी सॉल्टपॅन मार्गावरील आदर्श रहिवासी संघ येथील आडवा बाण चाळीत रविवारी रात्री 1 वाजता घडली. जखमींना परळ पूर्व येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आरोपी इजाज अनिश अहमद अन्सारी (19) हा तरुण गंभीर जखमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

इजाज अनिश अहमद अन्सारी हा चोरी करण्याच्या उद्देशाने आडवा बाण चाळीतील सुनील थळे यांच्या घरावर चढला होता. परंतु त्याचा पाय अडकल्याने तोल जाऊन त्याने बचावासाठी घरावर लोंबकळणाऱ्या तारेला हात लावला. परंतु त्यात विद्युतप्रवाह उच्च असल्याने तो भाजला गेला आणि ती तार थळे यांच्या घरावर पडली. मोठा आवाज झाल्याने चाळकरी बाहेर आले. दरम्यान, सुनील थळे यांच्या घरात शॉट सर्किट झाल्याने घराची भिंत पुरुषोत्तम माडये आणि रमेश माने यांच्या घरावर कोसळली. त्यात सुनील थळे (42), शर्मिला थळे (32), श्रावणी थळे (10), पुरुषोत्तम माडये (67) आणि प्रवीण वेटकुली (30) हे पाच जण किरकोळ जखमी झाले असून इजाज अन्सारी 80 टक्के भाजून गंभीर जखमी झाला. तर येथील 55 घरातील लाईट मीटर, टीव्ही, फ्रीज, पंखे, एसी ही विद्युत उपकरणे एकाच वेळी जळून खाक झाली आहेत. अचानक झालेल्या या घटनेने रहिवासी घाबरून बाहेर पळू लागले. मोठी हानी टळली असली तरी गेल्या दोन वर्षात वडाळ्यातील ही चौथी घटना असल्याची माहिती वडाळा पोलिसांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा