दुचाकी रस्त्यावर पार्क करत असाल तर जरा सावधान

 Kurla
दुचाकी रस्त्यावर पार्क करत असाल तर जरा सावधान

कुर्ला- चोरट्यांनी तब्बल 223 मोटारसायकल लांबवल्याची घटना कुर्लाच्या नेहरूनगरमध्ये उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कुर्ल्यातल्या गोल्डन प्लाझा या इमारतीच्या बाहेर 1 फेब्रुवारीला एक पल्सर आणि 222 इतर मोटारसायकल चोरट्यांनी लांबवली. मात्र ही चोरीची घटना झाली तेव्हा इमारतीचा सुरक्षारक्षकच डुलक्या घेत होता. याच ठिकाणी जवळच पोलीस स्थानक असूनही चोरट्यांनी बाईक पळवल्या. या घटनेमुळे चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिलेला नसल्याचं समोर आलं आहे.

Loading Comments