Lockdown : अखेर तळीरामांचा संयम सुटला! वाईन शॉप फोडून बाटल्या पळवल्या

लॉकडाउनमध्ये दारू मिळत नसल्यानं तळीरामांनी चक्क वाईन शॉप फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.

Lockdown : अखेर तळीरामांचा संयम सुटला! वाईन शॉप फोडून बाटल्या पळवल्या
SHARES

कोरोना (Coronavirus) चा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दूकानं बंद आहेत. तसंच १४ एप्रिलपर्यंत ड्राय डेही घोषित करण्यात आला आहे. आता दारूच मिळत नसल्यामुळे तळीरामांचा संयम सुटत चालला आहे. लॉकडाउन (Lockdown)मध्ये दारू मिळत नसल्यानं तळीरामांनी चक्क वाईन शॉप फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.  

मालाड (Malad)च्या एका वाईन शॉप (Wine Shop)मध्ये तळीरामांनी चक्क वाईन शॉप फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मार्वे इथल्या अंकल किचनच्या समोरच्या वाईन शॉपमध्ये हा प्रकार घडला. बालाजी वाईन्स असं या शॉपचं नाव आहे. दुकानात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घडलेला प्रकार कैद झाला. २ एप्रिल २०२० रोजी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी हा चोरीचा प्रकार घडला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही बघू शकता की, दोन जण दुकानाचं शटर तोडून आत घुसले. एक जण बाहेरच उभा होता. चोरटे आत घुसताच त्यांची दारूसाठी शोधाशोध सुरू झाली. सोबत आणलेल्या गोणीमध्ये ते दारूच्या बाटल्या टाकत आहेत. जवळपास त्यांनी त्यांच्याकडील गोणी पूर्ण भरलीच होती. पण समोरच्या इमारतीतील इसमानं हटकल्यावर त्यांची तारांबळ उडाली. बाहेरून आवाज आल्यानं ते गोंधळले आणि त्यांनी दारूच्या बाटल्यांनी भरलेली गोणी तिकडेच ठेवली. हातात होत्या तेवढ्या बाटल्या घेऊन त्यांना तिकडून पळ काढावा लागला. फक्त जाता जाता त्यांच्या हाती २ ते ३ बाटल्या लागल्या. त्याच बाटल्या घेऊन त्यांनी पळ काढला.

राज्यातील दारूची दुकानं १८ मार्चपासून बंद आहेत. बालाजी शॉप देखील तेव्हापासून बंदच होते. मालाड पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दुकानाची पाहणी केली. याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरांचा शोध सुरू आहे.

खरं पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून राज्य सरकारनं राज्यात लॉकडाउन केला आहे. यात फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील, असे आदेशही देण्यात आले आहेत. पण, व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना संयम राखणे, कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे असे प्रकार घडत आहे.



हेही वाचा

गोवंडीत टवाळखोरांकडून पून्हा पोलिसांवर हल्ला

संचार बंदीच्या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या दीड हजार नागरिकांवर गुन्हे


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा