धारावीतील व्यापारी हल्ला प्रकरणी तिसरा आरोपी अटकेत

  Dharavi
  धारावीतील व्यापारी हल्ला प्रकरणी तिसरा आरोपी अटकेत
  मुंबई  -  

  राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि व्यापारी हाजी मुस्तकीम शेख (60) यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात धारावी पोलिसांना यश आले आहे. एका अनोळखी व्यक्तीने 16 एप्रिलला त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यात हाजी शेख गंभीर जखमी झाले होते. यातील दोन आरोपींना चार दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. धारावीतील डोंबरखाना विभागातील म्हाडा ग्राऊंड परिसरात ही घटना 16 एप्रिलच्या सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली होती. अनोळखी व्यक्तीने देशी कट्ट्याने शेख यांच्यावर जवळून तीन वेळा गोळ्या झाडल्या. मात्र देशी कट्ट्यातून एकही राऊंड फायर न झाल्याने संतापलेल्या या आरोपीने शेख यांना पकडून त्यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्याने त्याच्याजवळ असलेल्या कट्ट्याने शेख यांच्या डोक्यावर प्रहार करत त्यांना गंभीर जखमी केले. याबाबत धारावी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्हीच्या अधारे पोलिसांनी आधी उत्तर प्रदेश येथून मोहम्मद अनिस शेख (33) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने हा हल्ला अहसान सुब्बाह सलमानी (28), अब्दुल कलाम जब्बार शेख (25) या साथीदारांच्या मदतीने केल्याचे कबूल केले. त्यानुसार अहसानला धारावीतून तर अब्दुलला उत्तर प्रदेश येथे जाऊन पोलिसांनी अटक केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.