शौचालयाच्या टाकीत गुदमरून तीन सफाई कामगारांचा मृत्यू

 Malvani
शौचालयाच्या टाकीत गुदमरून तीन सफाई कामगारांचा मृत्यू

मालाड - मालवणी परिसरात तिघा सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. शौचालयाची टाकी साफ करताना या तिघांचा मृत्यू झाला आहे. मूर्तीभाई हरिजन (30), मायाकाशी हरिजन (26) आणि काशी हरिजन (45) अशी मृतकांची नावे आहेत. तर राजकुमार नावाचा इसम जखमी झाला आहे. टाकीत गुदमरून तिघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गुरुवारी सकाळी मालवणी चर्च परिसरात एका खाजगी सोसायटीच्या शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी चौघे उतरले होते. पण आतल्या दुर्गंधी आणि वायूमुळे चौघांना त्रास होऊ लागला. तात्काळ अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. पण अग्निशमन दल येईपर्यंत चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला. मालवणी पोलीस याचा तपास करत आहेत.

Loading Comments