मानखुर्दमध्ये शौचालयाच्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू

 Mandala
मानखुर्दमध्ये शौचालयाच्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू
मानखुर्दमध्ये शौचालयाच्या टाकीत पडून तिघांचा मृत्यू
See all

मानखुर्द - शौचालयासाठी गेलेल्या तीन तरुणांचा टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी मानखुर्द येथे घडली आहे. शौचालयातील शौचकुंभ खाली कोसळल्याने तिघेही टाकीत पडले. रहिवाशांना ही बाब समजताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने तिघांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला. गणेश सोनी (35) हरिष पटेदार (40) आणि इसराईल अन्सारी (30) अशी मृतकांची नावं आहेत. याबाबत मानखुर्द पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.

Loading Comments