COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

बोगस गुणपत्रिका प्रकरण : विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई विद्यापिठाच्या अंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट मास्टर ऑफ सबस्टॅन्शिअल डेव्हलपमेंट या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत फेरफार करून बनवट गुुुुणपत्रिकेद्ववारे विद्यार्थ्यांना उतीर्ण केले जात होते.

बोगस गुणपत्रिका प्रकरण : विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक
SHARES

मुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पास करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन या विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात अाली अाहे.  मुंबई विद्यापीठ कलिना येथील गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार उघडकिस आला आहे.  या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिस तपास करत असल्याची माहिती बीकेसी पोलिसांनी दिली.


सीसीटिव्हीतून उघडकीस 

मुंबई विद्यापीठातील अनागोंदी कारभाराचं आणखी एक प्रकरण आता पुढं आलं आहे.  मुंबई विद्यापीठात पेपर घोटाळ्यानंतर आता बनावट गुणपत्रिकांचे प्रकरण पुढे आल्यानंतर विद्यापीठाचं नाक पुन्हा कापलं गेलं आहे. मुंबई विद्यापिठाच्या अंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट मास्टर ऑफ सबस्टॅन्शिअल डेव्हलपमेंट या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत फेरफार करून बनवट गुुुुणपत्रिकेद्ववारे विद्यार्थ्यांना उतीर्ण केले जात होते. याबाबत विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुणपत्रिका ठेवलेल्या ठिकाणचे सीसीटिव्ही पडताळले. त्यावेळी तिघेही गुणपत्रिका काढताना आढळून आले.  न्यायालयाने अारोपींना १९ आॅक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांचं विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत तीन आरोपींचा सहभाग निश्चित झाला अाहे. यामध्ये इतर आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.
- मनोज कुमार शर्मा, अतिरिक्त सह पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा