लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार


लग्नाचे आमीष दाखवून तरुणीवर अत्याचार
SHARES

लग्नाचे आमीष दाखवून २२ वर्षीय तरुणीशी शारिरीक संबध ठेवून कालांतराने तरुणीला लग्नाला नकार देणाऱ्या विरोधात साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऐवढ्यावरच न थांबता आरोपीने तरुणीचे अश्लील व्हिडिओ  आणि फोटो सर्वत्र वायरल करण्याची धमकीही देत असल्याचे मुलीने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- भारत बंद: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत

साकीनाका परिसरात  पीडित तरुणी ही आपल्या कुटुंबियांसोबत राहते. त्याच परिसरात आरोपी हा देखील वास्तव्यास आहे. दोघांमध्ये प्रेमसंबध होते. त्यावेळी लग्नाचे आमीष दाखवून आरोपी राहिल सलाम तांबे याने तरुणीशी शारिरीक संबध ठेवले. तसेच तरुणीच्या न कळत तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो त्याने काढून ठेवले होते. कालांतरे तरुणीने राहिलकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र राहिल वेगवेगळी कारणे देऊन तिला टाळत होता. पाठ सोडवण्यासाठी त्याने तरुणीला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र वायरल करण्याची धमकी देऊ लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने चेंबूर पोलिसात तक्रार नोंदवली.

हेही वाचाः- भारत बंद! मुंबईत बेस्ट, टॅक्सी सुरू राहणार

चेंबूर पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी साकीनाका पोलिसांकडे वर्ग केला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून राहिल सलाम तांबेवर ३७६(१)(एन), ५०६ भा.द.वि. कलमांतसह माहिती तंत्रज्ञान कायदा ६७(ए)  नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा