परदेशी नागरिकांना अंमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी टुरिस्ट गाइडला अटक

परदेशी नागरिकांसाठी टुरिस्ट गाइडचं काम करणाऱ्या तरुणाला अंमली पदार्थ पुरवत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

परदेशी नागरिकांना अंमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी टुरिस्ट गाइडला अटक
SHARES

परदेशी नागरिकांसाठी टुरिस्ट गाइडचं काम करणाऱ्या तरुणाला अंमली पदार्थ पुरवत असल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. निसार अहमद अब्दुल सत्तार (३६) असे त्याचं नाव आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं गुरुवारी कुलाब्यातून त्याला अटक केली आहे. तसंच, त्याच्याकडून ४ लाख रुपयांचे चरस (मनाली क्रीम) हस्तगत केले आहे.

अंमली पदार्थ

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना येथील टुरिस्ट गाइड अंमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वांद्र्यातील पोलिसांच्या पथकानं सापळा रचला. कुर्ला बस डेपो परिसरात सापळा लावून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने निसार सत्तार याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या.

संशयास्पद हालचाल

यावेळी निसार याच्या हालचाली संशयास्पद आढळल्यानं त्याला तेथून ताब्यात घेण्यात आलं. झडतीमध्ये त्याच्याकडे ८०० ग्रॅम चरस (मनाली क्रीम) हा अंमली पदार्थ सापडला. कुर्ला येथून अंमली पदार्थ घेऊन तो कुलाबा, गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी पर्यटकांना पुरवत असल्याचं पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे.हेही वाचा -

एअर इंडियाच्या इंजिनीअरचा गोणीत सापडला मृतदेह

CAB: शिवसेनेची गैरहजेरी भाजपच्या पथ्यावर?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा