दहिसरमध्ये झाड पडून एकीचा मृत्यू


दहिसरमध्ये झाड पडून एकीचा मृत्यू
SHARES

राज्यात मान्सूनचं अागमन झाल्यानंतर दोन दिवसांपासून मुंबईत पावसानं तुफान बॅटिंग केली. काही ठिकाणी बरसलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या अाहेत. दादरमध्ये मारुती रोडवरील एक झाड कोसळून चार जण जखमी झाले अाहेत. तर दहिसरमध्ये झाड कोसळण्याच्या घटनेमुळे एका १३ वर्षीय तरुणीला अापले प्राण गमवावे लागले अाहेत.दृष्टी मुकेश मुंगराचा मृत्यू

दहिसर येथील एस. एन. दुबे रोडवर शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास झाज पडून दृष्टी मुकेश मुंगरा ही तरुणी जखणी झाली होती. घटनेनंतर तिला लगेलच दहिसर येथील रोहित नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात अाले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डाॅ. उदय यादव यांनी सांगितले. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अाकस्मिक मृत्यूची नोंद केली अाहे.


दादरमध्ये झाड कोसळले

शनिवारी रात्री ११.४५च्या सुमारास दादर पश्चिम येथील सीकेपी हाॅलसमोरील मारुती रोडवरील एक झाड कोसळून चार जण जखमी झाले अाहेत. जखमींना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले होते. त्यापैकी तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात अाले अाहे. मात्र श्रेया राऊत (२०) या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात अाहे. माजी शाखाप्रमुख भरत राऊत यांची ती कन्या असून तिच्या मणक्यावर शस्त्रक्रिया सुरू अाहे. काल रात्री ते सिनेमा पाहून घरी परतत असताना अचानक पाऊस अाल्याने त्यांनी या झाडाचा अाश्रय घेतला होता. दरम्यान, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या ठिकाणाला भेट दिली. 


हेही वाचा -

मुंबईकरांनो सावधान! ८ ते १० जूनदरम्यान मुंबईत अतिवृष्टी

पावसात मॅनहोल्सचे झाकण उघडल्यास जेलची वारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा