Advertisement

मुंबईकरांनो सावधान! ८ ते १० जूनदरम्यान मुंबईत अतिवृष्टी


मुंबईकरांनो सावधान! ८ ते १० जूनदरम्यान मुंबईत अतिवृष्टी
SHARES

दोन दिवस पावसानं हजेरी लावली अाणि मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. मुंबईतील सर्व यंत्रणा कोलमडून पडल्या तर पहिल्याच पावसात तीन जणांना अापला जीव गमवावा लागला. पण येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस बसरणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली अाहे. त्यामुळे गरज असल्यास बाहेर पडा, असा इशाराही हवामान खात्यानं दिला अाहे. ७ जूनला खऱ्या अर्थानं मुंबईत मान्सूनला सुरुवात होणार असून ८, ९ अाणि १० जून रोजी मुंबईत अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्यातील शास्त्रज्ञ अजयकुमार यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


अरबी सुमद्रात कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळं ८ जूनपासून पुढच्या ४८ तासांमध्ये मुंबईसह कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचं अजयकुमार यांनी सांगितलं. यासंबंधीची माहिती सर्व संबंधित विभागांना देत सर्तकतेचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


मुंबईकरांनो घराबाहेर पडू नका

त्यामुळे मुंबईकरांनो ८, ९ आणि १० जूनला खबरदारी घ्या, पावसाचा जोर असल्यास घराबाहेर पडू नका, असं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा देतानाच हवामान खात्यानं नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं असून नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.


पहिल्या पावसातच दाणादाण

शनिवारी मुंबईत पावसानं एंट्री केली अन् पहिल्याच पावसात मुंबईची चांगलीच दणादाण उडाली. वीजेचा धक्का लागून तीन जणांचा बळी गेला. त्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा एकदा पाऊस बरसला आणि मुंबईची बत्ती गुल झाली. काही मिनिटांच्या पावसानंच मुंबईतल्या अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि सरकारी यंत्रणांच्या कारभाराची पोलखोल झाली. आता ७ जूननंतर पावसाचा वेग वाढणार असून कोण किती पाण्यात अाहे, हे लवकरच सर्वांसमोर येईल.


हेही वाचा -

७ ते १० जूनदरम्यान मान्सून होणार मुंबईत दाखल

दुसऱ्या पावसाने केली मुंबईकरांची बत्तीगुल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा