SHARE

तुर्भे - अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 36 वर्षाच्या नराधमाला गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. किरण वैती असे या आरोपीचे नाव असून तो तुर्भे परिसरातील राहणारा आहे. गुरुवारी सहा वर्षांची चिमुकली घरात एकटीच असल्याची संधी साधत त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीच्या आईने हा प्रकार पाहताच आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या