पोलीस शोधताहेत 'त्या' मुलाचे पालक

 Cheetah Camp
पोलीस शोधताहेत 'त्या' मुलाचे पालक

ट्रॉम्बे - चित्ता कॅम्प परिसरातील एका रिक्षा स्टँडवर ट्रॉम्बे पोलिसांना बुधवारी 5 वर्षांचा मुलगा सापडला आहे. ट्राॅम्बे पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेउन त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला आहे. मुलगा घाबरलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप त्याच्याविषयीची कोणतीच माहिती मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या मुलासंदर्भात कुणालाही काही माहिती असल्यास तात्काळ ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब सोनूर यांच्याशी 9619179801 या क्रंमाकावर संपर्क साधावा असं अावाहन पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी केलं आहे.

Loading Comments