माटुंगा - शनिवारी रात्री एकच्या सुमारास माटुंगा परिसरातल्या पुलावर दुधाचा ट्रक उलटल्यानं काही तासांसाठी मुंबईकडे येणारी वाहतूक बंद करावी लागली. पिशव्यांमध्ये भरलेलं 4 हजार लिटर दूध हा ट्रक उलटल्यानं वाया गेलं. वाशीकडून येणारा हा ट्रक माटुंगा पुलावर आल्यावर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे उलटला. या अपघातामध्ये कुणीही जखमी झालं नसलं, तरी पोलिसांनी चौकशीसाठी या ट्रकच्या चालकाला ताब्यात घेतलंय. तो मद्यपान करून ट्रक चालवत होता का, याचीही तपासणी पोलिसांकडून सुरू आहे.