शिक्षिकेची चिमुरडीला बेदम मारहाण

 Dalmia Estate
शिक्षिकेची चिमुरडीला बेदम मारहाण
शिक्षिकेची चिमुरडीला बेदम मारहाण
शिक्षिकेची चिमुरडीला बेदम मारहाण
See all

मुलुंड - पेन्सिल आणली नाही म्हणून एका खासगी शिवकवणीच्या शिक्षिकेने चिमुरडीला जबर मारहाण केल्याची घटना मुलुंड पश्चिमेकडील अशोकनगर परिसरात घडलीय. अशोकनगरमधील एका सामान्य घरातील ही चिमुरडी असून ती इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. तिचे वडील रिक्षाचालक असून आपल्या मुलीला इंग्रजी विषय कठीण जात असल्यानं त्यांनी तिला जवळील खासगी शिकवणीला घातले. पण तेथील शिक्षिका या चिमुरडीला लहानसहान गोष्टींवरून मारहाण करत असे. मंगळवारी या शिक्षिकेने पेन्सिल आणली नाही या क्षुल्लक कारणावरून लाकडी पट्टीने बेदम मारहाण केली. मुलीनं तेथून पळ काढून आपले घर गाठले. भीतीपोटी सुरुवातीला चिमुरडीने काही सांगण्यास नकार दिला परंतु नंतर घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने थेट शिकवणी गाठून त्या शिक्षिकेची कान उघाडणी केली. पण त्या चिमुरडीच्या पालकांनी अद्याप पोलीसांत तक्रार केलेली नाही. या सर्व प्रकारामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

Loading Comments