कांदिवलीतील बारावीत शिकणाऱ्या मुलाला १५ जणांकडून मारहाण

एका नामांकित कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या मुलाला १५ जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीमध्ये घडली. युवराज चौरसिया (१७) असं या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नावं आहे.

कांदिवलीतील बारावीत शिकणाऱ्या मुलाला १५ जणांकडून मारहाण
SHARES

एका नामांकित कॉलेजमध्ये बारावीत शिकणाऱ्या मुलाला १५ जणांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीमध्ये घडली. युवराज चौरसिया (१७) असं या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं नावं आहे. जखमी विद्यार्थ्यानं कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी पोलीसांनी तक्रारदारालाच आरोपींचा पत्ता शोधून आणण्यास सांगत याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवला.

लोकमत या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलाला १५ जणांनी मारहाण केली. यातील बहुतेक जण हे याच संबंधित कॉलेजमध्ये पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असल्याचा दावा जखमी विद्यार्थ्याने केला. मात्र याविरोधात कॉलेजने कोणतेही कायदेशीर पाऊल उचललेले नाही. कांदिवली पोलिसांनी तक्रारदारालाच आरोपींचा पत्ता शोधून आणण्यास सांगत याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा (एनसी) नोंदवला.

तक्रारदार विद्यार्थी हा वाणिज्य (कॉमर्स) शाखेत शिकतो असून, १० मार्च रोजी कॉलेजमध्ये हल्लेखोर घोळका करून उभे होते. त्यावेळी त्यांना साईड द्या, अशी विनंती विद्यार्थ्याने केली. त्यावर त्यातील एकाने विद्यार्थ्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातून तक्रारदार आणि हल्लेखोर गटात भांडण झाले.

कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तक्रारदार घरी जाण्यासाठी निघाला. त्यावेळी हल्लेखोर गट त्याची वाट पाहत कॉलेज गेटकडे उभा होता. तो जसा बाहेर आला तसा त्यांनी त्याला पकडले व मारहाण केली. यात त्याच्या डोळ्याला व हातापायाला दुखापत झाली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा