COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

जुळ्या रिक्षांनी केले पोलिसांना हैराण, एक जागेवर उभी, दुसरी तोडते नियम


जुळ्या रिक्षांनी केले पोलिसांना हैराण, एक जागेवर उभी, दुसरी तोडते नियम
SHARES

हिंदी सिनेमांमध्ये आपण अनेकदा नायक किंवा खलनायकांना दुहेरी भूमिकां(डबल रोल)मध्ये वावरताना पाहिले असेल. त्यातील एक व्यक्तीरेखा समाजात जाऊन दृष्कृत्य करत गडप होते. पण सगळा दोष माथी मारला जातो त्याच्यासारख्याच हुबेहुब दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या. हा झाला सिनेमातला प्रकार, मात्र असा प्रकार वास्तवातही घडत असल्याचे तुम्हाला सांगितले तर? ते देखील गाड्यांच्या बाबतीत? तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. कारणही तसेच आहे. कांदिवलीतल्या समता नगर पोलिसांना सध्या जुळ्या ऑटो रिक्षांनी असेच हैराण केले आहे. एक रिक्षा जागेवरच उभी असते. तर दुसरी त्याच क्रमांकाची रिक्षा शहरभर फिरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत कमाई करत असते. दुर्दैवाने सिनेमातील ड्रामाप्रमाणे जागीच उभ्या असणाऱ्या रिक्षाच्या मालकाला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरावा लागतो.

या दोन्ही रिक्षांचे क्रमांक जरी एकसारखे असले, तरी त्यांचे मालक मात्र वेगवेगळे आहेत.६ महिन्यांत १० वेळा दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पूर्वेकडील जयहिंद नगरमध्ये राहणाऱ्या सविता गावडे यांच्या मालकीची एक जुनी रिक्षा आहे. ही रिक्षा जुनी असल्याने बहुतांश वेळ जागेवरच उभी असते. क्वचितच ती रस्त्यावर धावते. तरीही मागच्या ६ महिन्यांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या रिक्षाच्या मालकीन बाईंना साडेतीन हजार रुपयांच्या १० दंडाच्या पावत्या आरटीओकडून ई-चलानद्वारे धाडण्यात आल्या.


अशी सापडली रिक्षा

रिक्षा जागेवर उभी असूनही हा दंड कुठल्या आधारावर भरण्यास सांगितला आहे? याची विचारणा करण्यासाठी आरटीओत गेलेल्या गावडे यांचे तेथे कुणीही एेकूण घेतले नाही. मात्र त्यांच्या मदतीला दहिसर वाहतूक शाखेत कार्यरत असेलेले पालव नावाचे एक कॉन्स्टेबल धावून आले. या कॉन्स्टेबलने १२ जुलै रोजी सांताक्रूझमध्ये समान क्रमांकाच्या रिक्षाला १ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी खऱ्या अर्थाने तपासाची सूत्रे हातात घेतली. पोलिसांचा तपास सुरू असतानाच समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना ही समान क्रमांकाची दुसरी रिक्षा आढळून आली. या रिक्षाला पोलिसांनी ताब्यात घेऊन रिक्षा चालकाची चौकशी सुरू केली आहे. ही रिक्षा नेमकी कुणाच्या नावावर आहे, याची रिक्षा चालकालाही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू अाहे.हे देखील वाचा -

प्रेयसीसाठी लीक केला 'गेम ऑफ थ्रोन्स'?डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा