मौजमजेसाठी ते चोरायचे दुचाकी

वांद्रे आणि डी. एन. नगर पोलिसांनी दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन तरूणांना अटक केली आहे. दोघांकडून पोलिसांनी १३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

SHARE

वांद्रे आणि डी. एन. नगर पोलिसांनी दुचाकींची चोरी करणाऱ्या दोन तरूणांना अटक केली आहे. दोघांकडून पोलिसांनी १३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. हे दोघेही फक्त मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असल्याचं समोर आलं आहे.

दोघांनी दुचाकी चोरून त्यावर स्टंट करून त्याचे व्हिडीओदेखील बनवले आहेत. अंधेरी पश्चिमेकडील आंबोली परिसरात राहणाऱ्या कुलदीप विजय शर्मा (१९) या या तरुणाला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ६ बजाज पल्सर पोलिसांनी जप्त केल्या. त्याने ह्या दुचाकी डी. एन. नगर, वर्सोवा, ओशिवरा येथून चोरल्या होत्या. 

वांद्रे पोलिस ठाण्याच्या पथकाने नीरज कुमार तुलसीदास (२१) या दुचाकी चोराला विमानतळ मेट्रो स्थाकाजवळून अटक केली. त्याने वांद्रे पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार दुचाकी चोरल्याचं उघडकीस आलं आहे. नीरज हा मूळचा दिल्लीचा राहणारा आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या.हेही वाचा -

पबजीनं घेतला तरूणाचा जीव

गँगस्टर फझल उल रेहमानला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या