पबजीनं घेतला तरूणाचा जीव

पबजीमुळे जीव गमवावा लागलेला कर्जत तालुक्यातील सुयोग हा तिसरा तरुण आहे. या गेमचे व्यसन जडलेले शेकडो तरुण या तालुक्यात आहेत.

पबजीनं घेतला तरूणाचा जीव
SHARES

तरूणांमधील पबजी गेम खेळण्याचं व्यसन घातक ठरत आहे. आतापर्यंत अनेक तरूणांचा या गेमपायी बळी गेला आहे.  कर्जत तालुक्यातील  सुयोग अरुण क्षीरसागर (२३) या तरूणाचा पबजी गेम खेळण्याच्या व्यसनातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पबजीमुळे जीव गमवावा लागलेला कर्जत तालुक्यातील सुयोग हा तिसरा तरुण आहे. या गेमचे व्यसन जडलेले शेकडो तरुण या तालुक्यात आहेत. पबजीचं व्यसन जात नसल्याने अनेक पालक हतबल झाले आहेत. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे सुयोग राहत होता. मागील वर्षापासून तो पबजी गेमच्या आहारी गेला होता. बारावीच्या शिक्षणानंतर सुयोग वडिलांना व्यवसायात मदत करू लागला होता. अँड्रॉईड मोबाइल खरेदी करून इतर मित्रांबरोबर तो पबजी गेम खेळण्यास शिकला. कालांतराने त्याला या गेमचं व्यसन जडलं.

दुकानातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर तो पबजी गेम खेळायचा. तो तासनतास हा गेम खेळू लागला. मागील पंधरा दिवसांपासून सुयोग मनोरुग्ण अवस्थेत गेला.  काहीही न बोलता तो गावामध्ये रात्रंदिवस फिरत असे. आठ दिवसांपूर्वी त्याचे वडील अरुण क्षीरसागर यांनी त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.  मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्याची मृत्यू झाला. 



हेही वाचा -

गँगस्टर फझल उल रेहमानला अटक

मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांवर 'क्यूआरटी' नियुक्ती




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा