Advertisement

मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांवर 'क्यूआरटी' नियुक्ती

मध्य रेल्वेनं मुंबई विभागातील सर्वाधिक गर्दीच्या ६ जास्त रेल्वे स्थानकांवर क्वीक रिस्पॉन्स टिमची (क्यूआरटी) नियुक्ती केली आहे.

मध्य रेल्वेच्या ६ स्थानकांवर 'क्यूआरटी' नियुक्ती
SHARES

मुंबईतील रेल्वे स्थानकं नेहमीचं दहशतवाद्यांच्या केंद्रस्थानी असतात. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमणात ये-जा होत असते. त्यामुळं दहशतवादी रेल्वे स्थानकांवर हल्ले करतात. या हल्ल्यांपासून प्रवाशांटी सुरक्षा व्हावी तसंच, मुंबईकरांना भयमुक्त प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वेनं मुंबई विभागातील सर्वाधिक गर्दीच्या ६ जास्त रेल्वे स्थानकांवर क्वीक रिस्पॉन्स टिमची (क्यूआरटी) नियुक्ती केली आहे. त्याशिवाय संशयास्पद वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी २८ श्वान पथकांनाही पाचारण केलं आहे.

गाड्यांची तपासणी

या श्वानपथकांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. २६/११ च्या धर्तीवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मध्य रेल्वेकडून या उपाययोजना करण्यात येत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लांब पल्ल्यांच्या गाड्या सीएसएमटी-एलटीटी या ठिकाणी येत असतात. या स्थानकांर प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळं या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाच्या आहेत.

एक्सरे बॅग मशिन

यानुसार रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी १६ एक्सरे बॅग मशिन रेल्वे स्थानकांवर तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं शस्त्रास्त्रधारी प्रशिक्षित जवानांसह गर्दी नियंत्रण करण्यासाठी होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचेही जवान तैनात करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.

संशयास्पद वस्तू

रेल्वे स्थानकं किंवा मेल-एक्स्प्रेसमध्ये संशयास्पद वस्तू अनेक आढळतात. यापैकी वस्तूंची तपासणी करण्यासाठी श्वान पथकांची नियुक्ती करण्याचे आदेश आहेत. एक प्रशिक्षित श्वान, २ आरपीएफ जवान अशी पथकं तयार करण्यात आली आहे.


स्थानकांची तपासणी

या पथकाच्या माध्यमातून मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर स्थानकावरील सर्वच रेल्वे स्थानकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय, मेल-एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये विशेषत: मालडब्यांतील सीलबंद सामानांची कसून तपासणी करण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकांतील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एकूण ३१४० सीसीटीव्ही कार्यान्वित असून याची देखरेख आरपीएफ नियंत्रण कक्षात करण्यात येते. मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या सीएसएमटी स्थानकांवर २४ तास बॉम्बनाशक पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.


जवानांची नियुक्ती

लोकलमध्ये गैरप्रकार घडू नये, यासाठी मध्य रेल्वेवरील लोकल यार्डमध्ये ही रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीएसएमटी, कुर्ला, दादर, एलटीटी, सानपाडा या आणि लोकल उभ्या राहणाऱ्या एकूण ९ ठिकाणी आरपीएफ जवान नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

बुधवारीच बहुमत चाचणी घ्या, गुप्त मतदानही नको- सर्वोच्च न्यायालय

स्थायी समिती विरुद्ध पालिका प्रशासन वाद पेटणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा