SHARE

मागील बारा वर्षांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या तीन बोगस डॉक्टरांना मालवणी पोलिसांनी गजाआड केले आहे. वैद्यनाथ सुधीर अधिकारी (54), सिराज अली प्रसाद अन्सारी(35) आणि बुद्धीचंद्र दिलीप मौर्य (48) अशी तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यनाथ अधिकारी मालवणी परिसरातील गेट क्रमांक 6 येथील प्लॉट क्रमांक 14 वरील खोली क्र. ३ मध्ये अधिकारी नावाचे क्लिनिक चालवत होता. तर मौर्य मालवणीतील भावरेकर नगरमधील वैभव सोसायटीत मौर्य क्लिनिक नावाने रुग्णालय चालवत होता. कुठलीही वैद्यकीय पदवी आणि आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नसताना हे तिघेही 12 वर्षांपासून बेधडकपणे कायद्याचे उल्लंघन करत रुग्णांच्या जीवाशी खेळत होते.

यासंदर्भात वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फंटागरे म्हणाले की, मालवणी परिसरात तिन बोगस डॉक्टर क्लिनिक चालवत असल्याची तक्रार मुंबई महापालिकेने दिल्यावर आम्ही ही कारवाई केली. या तिघांवर भादंवी कलम 419, 420 आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर अॅक्टचे कलम 33 आणि 36 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या