पंतप्रधानांना व्हॉट्स अॅपवरून शिवीगाळ, गुन्हा दाखल

 Sewri
पंतप्रधानांना व्हॉट्स अॅपवरून शिवीगाळ, गुन्हा दाखल

धारावी - पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपमानास्पद शब्द उच्चारलेल्या व्हीडिओचे चित्रन व्हॉट्स अॅप ग्रुपवर टाकल्याप्रकरणी दोघांविरोधात धारावीतल्या शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जाफर अली कुतुबुलाद मसकर चौधरी उर्फ पप्पू चौधरी (४२) असे त्याचे नाव असून दुसरा अज्ञात असल्याचे समजले. भाजप मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रमाकांत गुप्ता, धारावी अध्यक्ष मणी बालन यांनी तत्काळ आपल्या कार्यकर्त्यांसह शाहूनगर पोलीस ठाणे गाठले आणि पंतप्रधान मोदींना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या माथेफिरूना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. एसीपी. एस. आर. कांबळे शाहूनगर पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि व्हॉट्स अॅप ग्रुपवरील व्हीडिओ क्लिप पाहून त्यांनी सराईत माथेफिरू विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले.

Loading Comments