मर्सिडीजच्या धडकेत दोन पोलीस जखमी

 BEST depot
मर्सिडीजच्या धडकेत दोन पोलीस जखमी

कुलाबा - एका मर्सिडिज कारच्या धडकेत पेट्रोलिंगवर असलेले दोन पोलीस जखमी झाल्याची घटना सोमवारी कुपरेजा मैदानाजवळ घडलीय. दोनही पोलीस बाइकवरून गस्त करत असताना त्यांना या भरधाव मर्सिडीजनं उडवलं. अपघातानंतर घाबरलेल्या चालकानं पळ काढला. पोलिसांनी मर्सिडीज कार ताब्यात घेतली असून सध्या आरटीओ मार्फत चालकाचा पोलीस शोध घेतायेत. या अपघातात रामचंद्र लोखंडे (48), नितिन चव्हाण (32) हे दोघे जखमी झालेत. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

Loading Comments