जे.जे. रुग्णालयात २ निवासी डॉक्टरांना मारहाण


जे.जे. रुग्णालयात २ निवासी डॉक्टरांना मारहाण
SHARES

रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयातील २ निवासी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोडही केली. या मारहाणीत जखमी झालेल्या एका डॉक्टरवर सध्या उपचार सुरू आहेत.


कधी घडली घटना?

जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ११ जेथे सर्जरी केली जाते तेथील दोन ज्युनिअर निवासी डॉक्टरांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.


आरोपींविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी जे. जे. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. यामध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. आरोपींविरोधात भादंवि कलम ३५३ आणि ३३२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आरोपींवर तोडफोडीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डनेही निषेध व्यक्त केला आहे.



हेही वाचा-

टीबीच्या रिपोर्टसाठी नवी टेक्नोलॉजी, १ तासात रिपोर्टस् मिळणं शक्य?

५० हजार रूग्ण, १२ स्थानकं आणि वन रुपी क्लिनिकची वर्षपूर्ती!


 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा