Advertisement

टीबीच्या रिपोर्टसाठी नवी टेक्नोलॉजी, १ तासात रिपोर्टस् मिळणं शक्य?

टीबी रुग्णाचे रिपोर्ट एक ते दीड तासांत मिळणं शक्य होणार आहे. कारण, टीबी रुग्णाचे रिपोर्ट आणि निदान लवकर व्हावं, यासाठी परळच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये नवीन टेक्नोलॉजीसाठी संशोधन सुरू आहे. या नव्या टेक्नोलॉजीमुळे टीबीचं निदान अवघ्या तासाभरात करणं सहज शक्य होणार आहे.

टीबीच्या रिपोर्टसाठी नवी टेक्नोलॉजी, १ तासात रिपोर्टस् मिळणं शक्य?
SHARES

एखाद्या व्यक्तीला टीबी झाल्यास त्याच्या कुटुंबातील प्रत्येक जण घाबरून जातो. त्या एका व्यक्तीमागे प्रत्येकाचीच धावपळ होते. या सर्व परिस्थितीत सर्वात जास्त वाट पाहावी लागते ती म्हणजे रुग्णाच्या रिपोर्टची. पण, आता टीबी रुग्णाचे रिपोर्ट एक ते दीड तासांत मिळणं शक्य होणार आहे. कारण, टीबी रुग्णाचे रिपोर्ट आणि निदान लवकर व्हावं, यासाठी परळच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये नवीन टेक्नोलॉजीसाठी संशोधन सुरू आहे. या नव्या टेक्नोलॉजीमुळे टीबीचं निदान अवघ्या तासाभरात करणं सहज शक्य होणार आहे.


नव्या टेक्नोलॉजीसाठी संशोधन सुरू

निदान झाल्यानंतर अहवाल प्राप्त होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. पण, हा अहवाल मिळून उपचार सुरू होईपर्यंत रुग्णांची प्रकृती आणखी बिघडण्याची शक्यता असते. यासाठी टीबी चाचणीचा अहवाल तासाभरात मिळावा म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी सध्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन सुरू झालं आहे.


कसं करतात संशोधन?

या संशोधनाचे २ प्रकार आहेत. एक प्रयोग शाळेच्या स्तरावर आणि दुसरं रुग्णांचे सॅम्पल्स घेऊन केलं जातं. त्यातील प्रयोगशाळेच्या स्तरावरील संशोधन पूर्ण झालेलं आहे. आणि दुसऱ्या संशोधनात १५ रुग्णांचे सॅम्पल्स घेण्यात आले आहेत. म्हणजे अजून १൦൦ रुग्णांचे सॅम्पल्स आम्हाला घ्यावे लागणार आहेत, अशी माहिती हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. निशिगंधा नाईक यांनी दिली आहे. जानेवारी २൦१८ पासून हे संशोधन संस्थेत शिकणारे पीएचडीचे विद्यार्थी करत आहेत, असंही डॉ. नाईक यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.


९൦ लाखांचा निधी मंजूर

टीबीचं निदान पटकन व्हावं आणि रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठी हे संशोधन केलं जात आहे. यासाठी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीकडून ९൦ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

टीबीच्या रुग्णाला सरसकट ६ महिने उपचार घ्यावे लागतातच. पण, निदान लवकर झालं तर उपचार लवकर सुरू होऊ शकतात. अनेकदा संशयित रुग्णांचं टीबीचं निदान करताना २൦ टक्के चाचणी अहवाल चुकीचे येतात. आतापर्यंत १५ रुग्णांवर हे संशोधन करण्यात आलं आहे. अजून १൦൦ रुग्णांच्या सॅम्पल्सवर क्लिनिकली काम करावं लागेल.

डॉ. निशिगंधा नाईक, संचालक, हाफकिन इन्स्टिट्यूट रिसर्च सेंटर, परळ

या संशोधनासाठी महापालिकेच्या नायर रुग्णालयाची देखील मदत घेतली जात आहे. रुग्णांना एक्पर्ट टेक्नोलॉजी महाग पडते. त्यामुळे गरीबातल्या गरीबाला देखील या टेक्नोलॉजीमुळे फायदा करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचंही डॉ. नाईक यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा