आठ किलो गांजासह दोघांना अटक

 Chembur
आठ किलो गांजासह दोघांना अटक

मानखुर्द - गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाउंड परिसरातून रविवारी पोलिसांनी अटक केली. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. स्वप्नील निनावे (19) आणि सरस्वती पंडित (30) असं या आरोपींची नावं आहेत. मानखुर्द पोलिसांनी सापळा रचून या आरोपींना अटक केली. यामध्ये मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश कसले यांनी दिली.

Loading Comments