मुंबईला पुरवत होते भेसळयुक्त दुध

मुंबईला भेसळयुक्त दुध पुरवणाऱ्या चौघांना अटक

SHARE

मुंबईत नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या दूधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या भेसळखोरांच्या मुस्क्या आवळ्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.  गणेश सत्यनारायण नारळा, मच्छगिरी नरसिम्हा वडगाणी, यादेयहा पब्बू अशी या आरोपींची नाव आहेत. पोलिसांनी गोरेगाव येथे कारवाई करून चोघांना अटक केली आहे. तर या चौघांजवळून पोलिसांनी तब्बल २०० लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत केले आहे.

गोरेगावच्या भगतसिंगनगरमध्ये काही जण दूधाची फेसळ करत असल्याची माहिती गुन्हे शाखा १२च्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांसोबत पोलिसांनी भगतसिंग नगरमध्ये छापा टाकला. येथून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ८० लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत करण्यात आले. त्या आरोपीच्या चौकशीतून हनुमान नगरमध्येही भेसळ केली जात असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी छापा टाकून आणखी १३९ लिटर भेसळ केलेले दूध जप्त केले.

या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून  आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या चौघांकडून विविध कंपनीच्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या, मेणबत्या, कात्री तसेच भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. हे चौघे दूधभेसळ करून भगतसिंग नगर, हनुमान नगर तसेच आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये पुरवित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या