तरुणीच्या विनयभंगप्रकरणी दोन नौसैनिकांना अटक

 Colaba
तरुणीच्या विनयभंगप्रकरणी दोन नौसैनिकांना अटक
Colaba, Mumbai  -  

विनयभंगाच्या आरोपाखाली कुलाबा पोलिसांनी दोन नौसैनिकांना अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. संदीप मलिक (२७) आणि अंकित मलिक (२१) अशी या दोघांची नावे असून हे दोघेही नेव्हीमध्ये खलाशी म्हणून काम करतात.

२० वर्षीय मुलीने या दोघांवरही तिची आणि तिच्या मैत्रिणीची छेड काढल्याचा आरोप केला आहे. शुक्रवारी रात्री कुलाबाच्या मादाम कामा मार्गावर हे दोघे या २० वर्षीय तरुणीकडे टक लावून पाहत होते. एवढेच नव्हे तर या दोघांनी आपला पाठलागही केला, असे तिने आपल्या जबाबात म्हटले आहे. याचा जाब दोघींपैकी एका मुलीच्या भावाने विचाराला असता त्याला या दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. "या प्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना कलम ३५४ (ड), ३२३ आणि ३४ कलमांतर्गत अटक केली असून या दोघांनाही आज कोर्टात हजर केले. कोर्टाने दोघांची जामिनावर सुटका केली", अशी माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली.

Loading Comments