पवईत गर्दुल्यांची दहशत, डोक्यात फरशी टाकून तरुणाची हत्या


पवईत गर्दुल्यांची दहशत, डोक्यात फरशी टाकून तरुणाची हत्या
SHARES

दोघांच्या भांडणात मद्यस्थीसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाची दोन गर्दुल्यांनी हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. अरबाज मेहबूब शेख असं या मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी परिमोहम्मद शेख आणि शुभम अखिलेश सिंग या दोघांना अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

पवईच्या मिलिंदनगरमध्ये राहणारा अरबाज शेख सोमवारी रिद्धी मेडिकल समोरील म्हाडाच्या इमारती पुढून मित्रांसोबत जात होता. त्याच मेडिकल समोरील टपरीरवर परिमोहम्मद आणि शुभम हे दोघेही सिगारेट ओडत उभे होते. काही कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोघांमधील वाद मिटवण्यासाठी अरबाज पुढे गेला. आणि दोघांना जाब विचारत त्याने बाजूला केलं. मात्र अरबाज आपल्यावर दादागिरी करत असल्यानं दोघांनी अरबाजलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. 

ऐवढ्यावरच न थांबता दोघांनी जवळील फरशी आणि पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून तेथून पळ काढला. या मारहाणीत अरबाज गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अरबाजला मृत्य घोषित केलं. याप्रकरणी पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा