15 हजारांसाठी केलेली हत्या 14 वर्षानंतर आली उघडकीस

राजभवनच्या मागील समुद्रात मार्च 2006 मध्ये एका गाठोड्यात मृतदेह नेव्हीच्या अधिकाऱ्यांना आढळून आला होता.

15 हजारांसाठी केलेली हत्या 14 वर्षानंतर आली उघडकीस
SHARES
मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रूवस्तीत 14 वर्षांपूर्वी अवघ्या काही हजारांसाठी पाच मिञांनी त्यांच्याच सहकाऱ्यांची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर नग्न मृतदेहचे  तुकडेकरून चादरीत बांधून ते गाठोडे राजभवनमागील समुद्रात सोडून आरोपींनी मुंबईबाहेर पळ काढला. मृतदेह आणि आरोपींबाबत कोणतिही माहिती नसताना. मलबार हिल पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करत या प्रकरणातील दोन आरोपीॆना दिल्लीतून अटक केली आहे.


मुंबईतल्या राजभवनच्या मागील समुद्रात मार्च 2006 मध्ये एका गाठोड्यात मृतदेह नेव्हीच्या अधिकाऱ्यांना आढळून आला होता. याबाबतची माहिती मलबार हिल पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली. काही दिवसांनी मलबार हिल मध्ये राहणारा रनसिंग उर्फ करणसिंग वाल्मिकी हा बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या मेव्हण्याने दिली होती. तो मृतदेह रनसिंग उर्फ करन सिंग याचा असल्याची ओळख पटली. तपासात रनसिंगने त्याच्या गावचे मिञ  धरमपाल, प्रेमपाल,  वीरपाल उर्फ वीरसिंग सतपाल, प्रेमपाल उर्फ बाबाजी यांना 15 हजार रुपयांची मदत केली होती. माञ ते पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. यातूनच झालेल्या वादात त्यांनी रनसिंगची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे तुकडे एका चादरीत बांधून ते गाठोडे राजभवनामागील समुद्रात सोडून देत आरोपींनी मुंबईतून पळ काढला होता.

या हत्येच्या गुन्ह्यात सन 2006 पासून आरोपींचा शोध पोलिस घेत होते. त्या हत्येनंतर सर्व आरोपी विभागले होत.  त्यानंतर ते गावीच गेले नाहीत, ना त्यांच्याबाबत गावातील नागरिकांकडे काही माहिती होती. मागील अनेक वर्षांपासून हा गुन्हा मलबार हिल पोलिसांत पेंडिग होता. काही दिवसांपूर्वी यातील एक आरोपी हरियानाच्या फरीदाबाद झोपडपट्टीत पत्नीसह रहात असल्याची गुप्तमाहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त राजीव जैन यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक पाटील यांनी पोलिस निरीक्षक वाघ, व पो उप निरीक्षक नाथ लोखंडे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश जाधव यांचे विशेष पथक बनवले होते. आरोपींची माहिती मिळताच पोलिस उप निरीक्षक  लोखंडे यांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले.

 मिळालेल्या माहितीनुसार पाहिजे आरोपी सतपाल नथू बाबू वाल्मिकी कृष्ण कोलनि फरीदाबाद हरियाणा येथील झोपडपट्टी मध्ये कोणतेही मोबाईल न वापरता राहत होता. अथक प्रयत्नानंतर रात्री 2 वाजता आरोपी नामे  सतपाल बाबू वाल्मिकी याला लोखंडे यांनी पकडले. त्याच्या चौकशीतून गुन्ह्यातील दुसरा पाहिजे आरोपी बाबाजी वाल्मिकी हा जगदंबा नगर मालवीय नगर नवी दिल्ली येथील झोपडपट्टीमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोखंडे यांच्या पथकाने त्याचा माग काढण्यास सुरूवात केली. माञ त्याची कुणकुण आरोपी बाबाजीला लागली. तो पत्नीसह पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मलबारे हिल पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या, या दोघांना पोलिसांनी भा.द.वी कलम 302, 201,34 अंतर्गत अटक केली आहे. तब्बल 14 वर्षानंतर या किचकट हत्येचा उलघडा लावण्यात मलबार हिल पोलिसांना यश आल्यानंतर वरिष्ठांकडून तपास अधिकाऱ्यांच्य कामाचे कौतुक केले जात आहे.  


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा