एकट्या नागरिकाला बंदुकीच्या धाकावर लुटणारे अटकेत


एकट्या नागरिकाला बंदुकीच्या धाकावर लुटणारे अटकेत
SHARES
ऐकाकडे सरकार कोरोना या संसर्गाशी दोन हात करण्यात व्यस्त असताना. परिस्थितीचा फायदा घेऊन दुसरीकडे भूरट्या चोरांनी पून्हा तोंड वर काढली आहेत. एकट्या दुकट्या नागरीकाला गाठुन त्यांना लुटण्यासाठी गोळीबार करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणा-या दुकलीला गुन्हे शाखेच्या कक्ष 11 च्या पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडुन देशी बनावटीचे पाच बोअरचे एक रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुस पोलिसांनी जप्त केली असुन, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनिकेत अरुण परिहार (22), क्लाव्ह क्लेव्हेन्स बोराटो (20) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मालाड येथील मालवणी परिसरातील जनकल्याननगर  येथील सोसायटीमध्ये पाचव्या माळयावर राहणा-या वृद्ध दांपत्यास  2 एप्रिलला रात्री  बेडरुममध्ये फटाक्या सारखा आवाज आल्याने त्यांनी बेडरुमची पहाणी केली यावेळी तेथे त्यांना तांबा धातूचा तुकडा मिळाला, तसेच बेडरुमच्या भिंतींचा आणि छताचा असलेला रंग उडून खड्डे पडल्याचे आढळले. यावेळी बेडरुमच्या खिडकीस असलेल्या तारेच्या जाळीस छिद्र पडलेले आढळले. त्यामुळे घाबरलेल्या दांपत्याने तत्काळ याची माहिती जावयाला दिली. जावयाने येऊन पाहणी केली असता, कोणीतरी गोळी झाडल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याने तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. एकीकडे कोरोनाचे संकट तसेच लॉकडाऊन असताना अशा प्रकारचा गोळीबार पाहुन तत्काळ याचा समांतर तपास गुन्हे शाखेने करण्यास सुरुवात केली.

गुन्हे शाखेच्या कक्ष 11 चे अजय कदम यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की, दोन व्यक्ती हे गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी शस्त्रांसह मालवणी येथे येणार आहेत. त्यानुसार, पोलिसानी सापळा लावुन या दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडुन पाच बोअरचे रिव्हाॅल्वर आणि एक जिंवत काडतुस जप्त केले. या दोघानी उत्तर प्रदेशातील मथुरा येथून हे शस्त्र लुटमार करण्यासाठी आणल्याची कबुली पोलिसाना दिली. तसेच त्यांनी राहत्यां घरातुन आकाशात गोळीचा राऊंड फायर केला असता, तो या दाम्पत्याच्या घरात गेल्याची कबुली दिली. तर यातील एक गुन्हेगार हा सराईत असुन, त्याच्यावर अनेक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा