आदिवासी प्रेमी युगुलाने संपवलं आयुष्य

 Kandiwali
आदिवासी प्रेमी युगुलाने संपवलं आयुष्य
Kandiwali , Mumbai  -  

घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यानं कांदिवली परिसरातील आदिवासी प्रेमी युगुलांनी झाडाला गळफास घेऊन एकत्र आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. कृष्णा वरके (35) आणि नीलम भोईर (21) अशी या दोघांची नावं आहेत. 

कांदिवली परिसरातील कालिमाता मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाला या दोघांचे मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आले. त्यानंतर नीलम भोईर हिच्या भावाने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. या प्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा आणि नीलम हे दोघं विवाहित आहेत. कृष्णाला दोन मुली आहेत तर, नीलम हिचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण तिचं लग्न फार काळ टिकलं नाही. काही दिवसांतच नीलमने तिच्या नावऱ्याचं घर सोडलं. कृष्णाच्या पत्नीचा अपघात झाला असून त्यात तिचे दोन्ही पाय निकामी झालेत. तेव्हापासून कृष्णा आणि नीलम हे दोघेही जवळ आले. त्या दोघांना लग्न करायचं होतं. पण घरच्यांना या दोघांचं प्रेमप्रकरण समजल्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळं त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

त्यांचं विवाहबाह्य नातं घरच्यांना समजल्यानं या प्रेमी युगुलाने आपलं आयुष्य संपवलं. 

- दिलीप यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समता नगर पोलिस ठाणे

Loading Comments