फटाक्यामुळे दुकानांना आग

 Chembur
फटाक्यामुळे दुकानांना आग

चेंबूर - मंगळवारी दुपारी चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी सर्व्हिस रोड परिसरातल्या दोन दुकानांना आग लागली. फटाक्यांची ठिणगी उडून आग लागल्याचं समोर आलंय. दुपारी चारच्या सुमारास या ठिकाणी फटाके फोडत असताना फटाक्याची ठिणगी जुन्या लाकडाच्या दुकानात उडाली. त्यामुळे या ठिकाणी आगीनं रौद्र रूप धारण केलं. दुकानदारांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीव नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती चेंबूर अग्निशमन दलानं दिली.

Loading Comments