अपघातात विद्यार्थी जखमी

 Govandi
अपघातात विद्यार्थी जखमी

गोवंडी - शाळेतून घरी जाताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत एक शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी संध्याकाळी गोवंडी येथे घडला. हमजा शेख (10) असं या मुलाचं नाव असून, तो शिवाजीनगर परिसरात राहणारा आहे.

हमजा शाळेतून घरी परतताना शिवाजीनगर सिग्नलजवळ भरधाव दुचाकीने त्याला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर दुचाकीस्वार रामसिंग कासमिया यांनी या मुलाला शताब्दी रुग्णलायत नेलं. तिथून अधिक उपचारासाठी त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णलयात हलवण्यात आलं आहे. याबाबत देवनार पोलिसांनी रामसिंगवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Loading Comments