• काॅंग्रेसच्या खंडणीखोर महिला अटकेत
SHARE

 

भट्टीपाडा - भांडुप पोलिसांनी खंडणी वसूल करणाऱ्या काँग्रेसच्या दोन महिलांना अटक केलीय. रशिदा शेख आणि बेगम हनिफ शेख अशी या महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिला भट्टीपाडा मार्केट रोडवर ऑम्लेट , बुर्जी पाव बनवणाऱ्या तरूणाकडून तीन हजार रुपयांची खंडणी वसूल करत होत्या. त्याचबरोबर खंडणी नाही दिली तर कारवाई करु अशी धमकी देखील देण्यात आली. रशिदा ही येथील काॅंग्रेस वार्ड अध्यक्ष आहेत. दोघींनी खंडणीची मागणी केल्यानंतर तरूणानं दिलेल्या तक्रारीवरून सापळा रचून दोघींनाही अटक करण्यात आल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या