ट्रॉम्बेमध्ये दोन तरुणांवर तिघाजणांच्या टोळीने पूर्ववैमनस्यातून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. मोहम्मद सलमान आणि सैयाब अशी या दोन तरुणांची नावे असून ते ट्रॉम्बेतील चिता कॅम्प परिसरातील सेक्टर ई येथे राहणारे आहेत.
वर्षभरापूर्वी याच परिसरातील काही अनोळखी तरुणांसोबत त्यांचा वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी सोमवारी रात्री या दोघांना अडवले. त्यानंतर दोघांना जबर मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. परिसरातील रहिवाशांना ही बाब समजताच त्यांनी दोघांनाही तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल केले. ट्रॉम्बे पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी या दोन्ही तरुणांच्या तक्रारीवरुन तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.