कर्ज भागवता न आल्यामुळे त्याने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव


कर्ज भागवता न आल्यामुळे त्याने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
SHARES

स्वतःच्या अपहरणाचा बनाव करणा-या उत्तर प्रदेशातील कापड व्यावसायिकाला शोधून काढण्यात भोईवाडा पोलिसांना यश आले आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बसल्यामुळे  देणेकरी घरी तगादा लागले. त्यामुळे कुटंबिय व देणेक-यांना टाळण्यासाठी त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला होता.

अविनाश चंद्र अस्थाना(५४) असे व्यापा-याचे नाव असून तो वाराणसीतील रहिवासी असून मुंबईत व्यावसायासाठी आला होता. लॉकडाऊमध्ये त्याला मोठे नुकसान झाल्यामुळे त्यामुळे त्याला देणेकरी पैसे व ग्राहकांना माल देता आला नाही. त्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. २९ डिसेंबरला त्याने कुटुंबियांना दूरध्वनी करून आपल्याला प्रचंड मारहाण झाल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने हाता पायाला फ्रॅक्चर पट्टी बांधल्याचे छायाचित्रही पाठवले होते. त्यानंतर त्याने फोन बंद केला. त्यामुळे कुटुंबियांना त्याला मारहाण करून कोणीतरी अपहरण केल्याचे वाटले. त्याचा भाई अविनाशचा शोध घेण्यासाठी मुंबईत आला. तो मुंबईत दादर पूर्व येथील एका लॉजमध्ये राहत असल्यामुळे त्यांनी स्थानिक भोईवाडा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर उपायुक्त विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद कांबळे व त्यांच्या पथकाने दादरमधील ५० हून अधिक लॉजमध्ये त्याचा शोध घेतला.


त्यावेळी तंत्रज्ञनाच्या मदतीने तपास केला असता सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेद्र जगदाळे यांना तो नागपूर येथे असल्याचे समजले. त्यावेळी नागपूरला एक पथक गेले असता एका ट्रस्टच्या खोलीमध्ये अस्थाना राहत असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याचे छायाचित्र कुटुंबियांना दाखवण्यात आले. त्याच्या भावाने त्याला ओळखल्यानंतर त्याला नागपूरवरून मुंबईत आणण्यातत आले. लॉकडाऊननंतर देणेकरी पैशांसाठी तगादा लावत असल्यामुळे सहानुभती मिळवण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले. त्याचे समुपदेशन केल्यानंतर त्याला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा