मोक्का प्रकरणातील आरोपी जेजे रुग्णालयातून फरार

 Mumbai
मोक्का प्रकरणातील आरोपी जेजे रुग्णालयातून फरार

भायखळा - तळोजा कारागृहातला मोक्का प्रकरणातील आरोपी जेजे रुग्णालयातून शनिवारी रात्री फरार झाला. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या आरोपीचं नाव हनुमंत उर्फ प्रेम पाटील (28) असं आहे. हनुमंत याला अपहरण, हत्येच्या विविध गुन्ह्याखाली पनवेल पोलिसांनी कामोठेमधून अटक केली होती. दीड वर्षांपासून तो तळोजा कारागृहात कैद होता. आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढल्यानंतर पोलिसांनी याची माहिती जेजे मार्ग पोलिसांना कळवली. आता पनवेल पोलीस आणि जेजे मार्ग पोलीस हनुमंत पाटील याचा कसून शोध घेत आहेत.

Loading Comments